!-- Global site tag (gtag.js) - Google Analytics --> Beter info: माणूस रोगी कशामुळे होतो

माणूस रोगी कशामुळे होतो

             माणूस रोगी कशामुळे होतो

आजच्या समाज रचनेत इतके स्वातंत्रतेचे वातावरण निर्माण झाले आहे की ,कोणत्याही व्यक्तीवर कशाचेच बंधन नाही. पूर्वीच्या आचार्यांनी धर्माच्या नावाखाली आरोग्याचे काही नियम घातलेले होते.आपल्या घरातील मोठी माणसे सोज्वळ असे वातावरण निर्माण करत.आणि त्यांचा आदर पण करत.आणि आता तर सगळे त्याच्या उलट होत आहे.

कारण त्या माणसाच्या खाण्यावर बंधन नाही, विचारसरणी वेगळी आहे, त्याच्या निद्रेवर सुध्दा बंधन नाही, त्यामुळे माणसाचे तोल सुटलेले आहे,माणसाचे मूळ रोग होण्याचे कारण म्हणजे अहितकारक त्यांचा आहारविहार आहे.आताच्या शिक्षणाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना परगावी राहावे लागते. आणि ते विध्यार्थी एकटेच असल्याने आहाराचे नियम त्यांना पळता येत नाही. पूर्वी गुरुगृही राहण्याची सोय होती. त्यामुळे गुरू त्या विद्यार्थ्यांवर नीट लक्ष ठेऊन असत,आणि तो विद्यार्थी एक चांगला नागरिक कसा बनेल यासाठी ते प्रयत्न करत असत. पण आता तो काळ खूप दूर गेला आहे. आणि माणूस भरकटला गेला आहे.


सरकार वेगवेगळ्या प्रकारची दवाखाने काढून आपल्या जनतेची सेवा करीत आहे. समजा माणसाला एखादा रोग झाला  तर त्या रोगावर निदान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता वेगवेगळे पदार्थ हे चांगल्या पद्धतीने निर्माण व्हायला पाहिजेत म्हणून आधुनिक पद्धतीच्या सोयी सुविधा निर्माण होत आहेत. उत्तम द्राक्ष किंवा अंजिराच्या बागा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यावर पडणाऱ्या रोगाच्या नासाकरिता वेगवेगळी जंतुनाशक पुरवली जात आहेत.त्यांचे फवारे उडविले जातात.व उन्हाळ्यात ती द्राक्षाची बाग उत्तम प्रकारे फुलली जाते.बहरली जाते.फळे सुध्दा चांगली येतात.पण या जंतुनाशक औषधांच्या फवाऱ्यामुले त्या द्राक्षात अगर त्या अंजीरावर त्यातील काही भाग तसाच राहतो.आणि ती फळे तशीच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. सामान्य माणसाला ह्या धोक्याची कल्पना नसते.आपण कोणताही विचार न करता ती फळे खातो.त्यामुळे त्या फळांवर जंतू नाशकाकरिता मारलेली विषारी द्रव्ये ही माणसाच्या पोटात जातात.विड्याच्या पानावर नुशी ही कीड असते.ही कीड हाताने मारत असत.पण हल्ली ही कीड जंतूनशकाच्या फवाऱ्याने मारली जाते.आणि म्हणून तो फवारा विड्याच्या पणावरही आपोआप जातो आणि आपण ती पाने न धुता खात असतो. त्यामुळे मनुष्य ह्या सगळ्या रोगाच्या आहारी जाऊ शकतो.
माणसाला रोग दोन प्रकारच्या आहार विहारामुळे निर्माण होतात.एक खूप पोषक आहार व अति खूप उत्तम विहार ,दुसऱ्या प्रकारचे रोग पुरेसा पोषक आहार आणि पुरेसा पोषक विहार ह्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतात.

आज ह्या समाजात अगदी आबाळ वृद्धांपर्यंत खूप उत्तम आहारामुळे सारखी लघवीला होत असते.त्यामुळे ह्याचा भुकेवर सुध्दा परिणाम होत असतो.आणि त्याचबरोबर रात्री झोपेत लाळ गळत असते.आणि मग थकवा येतो. जी व्यक्ती नेहमी आकंठ भोजन करते,तूप,तूप,लोणी,ह्यांचे सेवन करते.लाडू मिठाईसारखे पदार्थ ते नेहमी खातात.त्यामुळे त्यांना हे रोग होतात.आणि 35 ते 40 वर्ष्या पर्यंत व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब, अशक्तपणा, जीव घाबरून जाणे,पोटात वायू धरणे,वायू कोंडणे,अन्नाची रुची न लागणे.स्तुलता, इसब,गचकर्ण, खरूज,नायटे,संतती न होणे, हे विकार होतात.


म्हणून आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या खालील प्रमाणे,


1) सकाळी लवकर उठून रोज थोडा व्यायाम करावा. मग नंतर स्नान व प्रार्थना आपल्या नितिनियमप्रमाणे परमेश्वर चिंतन करावे.त्यामुळे चितसुधीं होते.आणि मन उल्हासित होते.मनाला सुख मिळतो.त्यामुळे माणूस निरोगी राहतो.


2) जेवनामधील अंतर हे चार ते पाच तास असावे.


3) आहारामध्ये चांगले अन्न असावे.


4) चांगले पदार्थ जास्त अतिसेवन करणाऱ्या वेक्तींनी आंबट,गोड पदार्थ जरूर खावे.


5) माणसाला जेवढी भूक लागली आहे तेवढाच आहार घ्यावा.


आपण निरोगी असावे, खूप जगावे, खूप जगावे, जगाचा आनंद घ्यावा,असे सर्वांना वाटते.आपण काही खाल्ले तरी ते पाचवे,आणि कधीही आजारी पडू नये, खूप श्रम करण्याची ताकद आपल्यात असावी,आणि आपला सोशिकपणा वाढावा असे वाटते.


पण वयक्तिक आरोग्याचे अज्ञान खूप माणसामध्ये दुसून येते,आपण कुठे चुकतो आहोत? हे त्याचं त्याला समजायला पाहिजे. पण असे काही घडून येत नाही. काही लोकांना वाटते की शरिराला चांगले अन्न मिळत नाही. म्हणून आपण अशक्त होत चाललो आहोत. तर काही लोकांना वाटते की ,आपणाला मानसिक आरोग्य लाभला नाही. म्हणून मन खूप कष्टी होत असते. काही लोकांना तर हवामान मानवत नाही. ह्या सर्वांसाठी उपाय आहे की आपल्या राहाणीत आणि विचार सरणीत बदल केला जावा.


काही आनुवंशिक विकार व उपजत व्येंगे सोडल्यास प्रत्येक माणूस हा जन्मापासून निरोगी असतो.व त्याच्यामध्ये रोग निवारण शक्तीसुद्धा खूप मोठी असते.माणसाने ही आपली नसर्गिक शक्ति जतन करून ठेऊन तर माणूस सहसा आजारी पडू शकणार नाही.


सुंदर आणि निरोगी जीवन जगण्यासाठी चांगले आहार व विहार यांची युक्तीने योजना करावी आहार आणि उपवास ,व्यायाम आणि विश्रांती यांची सांगड घालणे हे तर खूप चांगले काम आहे. अपुऱ्या पोषणाने वाईट अवस्था झालेल्या एका रुग्णाची माहिती एक सात वर्षाचा ,तो अगदी म्लान अवस्थेत होता.त्याच्या तोंडावर बसलेली माशी सुध्दा उडवण्याची ताकत त्यात नव्हती. रुग्ण तपासणी करताना त्याचे पुरेसे पोषण होत नाही असे दिसून आले, घरची परिस्थिती खूपच हलकीची ,आणि त्यामुळे पुरेसे पोषण करणे  त्या बालकास घरी ठेवले,रोज सकाळी नारळाचे पाणी व नंतर दूध,नारळाचे दूध, त्याच्या अंगास लावून उन्हात ठेवत असे,आणि प्रवाळ चद्रपुटी , एक महिन्यानंतर त्या बालकाच्या चेहऱ्यावर टवटवी आली. आता त्याची प्रकृती खूप चांगली आहे.


अवघ्या 18 वर्षाचा आजारी मुलगा ,त्याची अंगी खूप मास लठ्ठपणा, त्याला चालताना दम लागायचा, त्याच्या बुद्धीवर आणि स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता, रोज त्याला ताक आणि सातूचे पीठ देत,काही आसने, व चालण्याचा व्यायाम, असे केल्याने त्याच वजन 15 दिवसांमध्ये 10 पौंडने कमी झाले. हा दिनक्रम असाच चालू ठेवला आणि त्याची तब्बेत नॉर्मल होऊन तो आता कुस्ती खेळू लागला आहे. आणि आता त्याची तब्बेत सुधारली आहे.


म्हणून माणसाने आपल्या आहार ,विहारावर नियंत्रण ठेवल्यास माणूस कधीही रोगाच्या आहारी जाणार नाही. आणि त्याचे आयुष्य सुध्दा सुख समृद्धी जाईल.


रोगावर प्रतिकार कसे कराल:


निसर्ग हा आपल्या शरीरातील दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करत असतो.आणि आपण मग त्या नैसर्गिक क्रियेत जराशी नियंत्रणपणा ,सदाचार, आहारावर नियंत्रण ,विश्रांती ह्या गोष्टींची मदत झाली तर शरीर आरोग्यसंपन्न बनेल व आपले आयुष्य हे दीर्घायुष्य बनेल.

खर पाहायला गेलो तर, आहारावर आपले नियंत्रण असले म्हणजे रोग आपोआपच दूर होत जातात.तसेच आपल्या रोजच्या आहारात मधुर,आम्ल, लवण,तिखट, खारट, कडू,तुरट,हे रस कमीअधिक प्रमाणात आपल्या शरीरात आवश्यक आहेत.गोड, आंबट,खारट,रसाच्या योगाने वातदोष कमी होतो. तुरट,गोड, कडू,रसाचे पदार्थ हे पित्तदोष नाहीसे करतात.आणि कडू,तिखट,रसाने कफदोष नाहीसे होतात.


आपल्या शरीरात कोणताही दोष,निर्माण झाला तर कोणत्या तरी दोषांची प्राबल्य त्यात असतेच.आपल्या शरीरात कोणत्या दोषाचे प्राबल्य हे तज्ज्ञांच्या मदतीने समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आपला आहारविहार ठेवावा, वात दोष शरीरात वाढले असता बस्ती हा फार चांगला उपचार आहे.अंगात चमक मारणे,हातापायाची सांधे दुखणे,पपाठ दुखणे,कोणती तरी शीर आखडून त्यात वेदना होणे,वगैरगोष्टी होऊ लागल्या म्हणजे सर्वसाधारण वेक्तींनी आपणास हा त्रास वातदोषमुले होत आहे असे समजावे.आणि आपल्या आहारविहार मध्ये  त्याप्रमाणे  बदल करावा.सर्वसाधारणपणे आपण उपचार चालू करताना तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. वरिल दोष आपल्या शरीरात सुरू झाले किंवा सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली म्हणजे रोज अगर दिवसा आड बस्ती घ्यावा. बस्ती म्हणजे एनेमा रोज पाण्याचा बस्ती खूप चांगला परंतु रोज वयोमानाप्रमाणे एक तोळा नागरमोथा आणून त्यात एक शेर पाणी घालून तो नागरमोथा उकळावे(नागरमोथा कुटावी) पाणी अर्धेच उरवावे. मग ते पाणी गाळून त्यात अर्ध कप गाईचे दूध तो बस्ती घ्यावा. त्यामुळे शरीरात उत्पन्न होणारा वात दोष नाहीसे होतात. नंतर तिळाचं तेल हे खूप वातहारक आहे. कोणत्याही वात विकारावर तिळाचे तेल हे पोटात घेण्यास हरकत नाही. त्यामुळे वातदोष कमी होतात.वरून हळूहळू शरीरास व्यथा असणाऱ्या भागास लावून सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात घ्यावा. आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी तेल खूप उपयोगी पडते. तसेच वाताचे शमन करणारा रस म्हणजे लवण रस.लवण रस योग्य त्या प्रमाणात पोटात घ्यावा. लवण रसाचा शेक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लवण रस,मीठ,सैंधव वैगरे बारीक करावे व ते त्याची पुरचुंडी गरम करून दुखऱ्या भागावर शेक द्यावा.लवण रस पोटात घ्यावा.

पित्त दोषमुळे निर्माण होणाऱ्या विकारांवर 'विरेचन' हे मोठे  उपचार कर्म आहे.पित्त विकारांमध्ये एखादेवेळी अंगावर गांधी येतात,मळमळते, अन्नदोष होतो, तेव्हा अश्यावेळी विरेचन घेणे गरजेचे असते. विरेचन द्रवमध्ये त्रिफळा, एरंडतेल,सोनामुखी,नळीटेड ,हे जिन्नस वापरावे.पोटामध्ये कडू रसाची युक्तीने योजना करावी. कारण तो पित्तशामक आहे.पित्तदोषावर तूप हे खूप श्रेष्ठ द्रव पोटात घेणे योग्यच आहे.

आता कफ दोषामुळे माणूस हा नेहमीच घाबरून जातो. छातीत कफ धरलेला असतो.माणूस हा सुस्त झालेला असतो. कफ दोषावरील श्रेष्ठ उपचार कर्म म्हणजे 'वमन' वांती करून कफ बाहेर काढणे.यासाठी जेष्ठमध, मध,वेखंड, इत्यादी पदार्थांचे काढे पोटात द्यावे. त्यामुळे वांती होऊन कफ नाहीसा होतो. कफ असणाऱ्या व्याधींवर तिखट, कडू,आणि तुरट,हे रस क्रमाने वापरतात. ह्या रसाची आहार द्रव्ये पोटात घ्यावी. तिखट रस प्रथम वापरण्यात आल्यामुळे कफामुळे आलेला बुळबुळीतपणा,जडपणा, सुस्ती कमी होते, पण कडू रसाचा संस्कार करून वेगवेगळी आहार  द्रव्य बनवून ती खाण्यास द्यावी. कडू रसाच्या आहारामुळे  तोंडाचा गोडपणा कमी होतो व कफ नाहीसा होतो. कफदोष हा स्निग्ध पदार्थ शरीरात जास्त प्रमाणात गेल्यावर होतो. त्यामुळे तुरट रस स्निग्धपणा कमी करतो.

पित्तदोषाने आम उत्पन्न होतो. पित्तजन्य व्याधींवर गोड, कडू,तुरट,हे रस वापरावे.कडू रसाने आमचे पाचन होते. पित्तदोष उत्पन्न झाला असता गोड रसाने त्याचे शमन होते.गोड रसाची कोणतीही द्रव थंड,पचावयास जड आणि पचली म्हणजे शक्ती दायक आहेत.नंतर पित्तदोष शमन करण्यासाठी रस प्रधान द्रव्ये द्यावीत.

वातदोषावर खारट रसाची द्रव प्रथम द्यावीत.खारट रसाच्या अन्नाने व द्रव्याने वातरोग लवकर बरे होतात. खारट रस हा जड असल्याने वजन वाढते.

मनुष्याला होणारे रोग व त्याचे प्रकार अनेक आहेत.ग्रंथां मधून अनेक रोगांची कारणे, लक्षणे दिली आहेत.तरीसुद्धा असे खूप रोग माणसाच्या शरीरात उत्पन्न होत आहे की ज्याचे निदान होत नाही. कारणे समजत नाहीत. त्यावेळी घाबरून न जाता आपणास योग्य वाटेल ते द्रव्ये योजना करावी.व रोग नाहीसा करण्याच प्रयत्न केला पाहिजे.

एक-एक रसाचे एकच द्रव्ये न वापरता अनेक द्रव्ये एकत्र करून वापरावी.म्हणजे रोग नाहीसे होतात. दोषाचा अधिकपणा उत्पन्न झाला म्हणजे रोग व ते सम स्तिथीत असले म्हणजे आरोग्य, आपल्या रोजच्या वापरात रोग रोगनाशक द्रव्ये न वापरता वेगवेगळी आहार रस द्रव्ये युक्तीने वापरली जावीत.म्हणजे चांगले आरोग्य मिळेल व आपल्या अंगात प्रतिकार शक्ती निर्माण होऊन आपण आरोग्य संपन्न होतो.


............................................................................

English Translate:


In today's society, there is such an atmosphere of freedom that no one is bound by anything.  Earlier teachers used to impose some rules of health in the name of religion. The elders of our house used to create such an atmosphere and respect them.

 Because there is no restriction on the eating of that person, there is no restriction on his thinking, there is no restriction on his sleep, so the balance of the person is lost, the cause of the root disease of the person is their unhealthy diet.  And since they are the only students, they cannot escape the rules of diet.  Gurugriha used to be a place to stay.  So the Guru would keep a close eye on the students, and they would try to figure out how to make the student a better citizen.  But now that time is far gone.  And the man has gone astray.


 The government is serving its people by removing different types of hospitals.  Suppose a person has a disease, they are trying to diagnose the disease.  Come on


In today's society, even the weakest of the elderly have a very good diet and urination. So it also affects the appetite.  A person who eats a lot of food, consumes ghee, ghee, butter, etc.  , Flatulence, loss of appetite.


 So there are some important things for health as follows,


 1) Get up early in the morning and do some exercise every day.  Then after bathing and praying, the Lord should meditate according to his daily routine. Therefore, the mind becomes happy.


 2) The interval between meals should be four to five hours.


 3) The diet should include good food.


 4) People who overeat good foods should eat sour, sweet foods.


 5) A person should eat as much as he is hungry.

Everyone wants us to be healthy, to live a lot, to live a lot, to enjoy the world.


 But ignorance of personal health is ingrained in many people, where are we going wrong?  He should understand this.  But that doesn't happen.  Some people think that the body does not get good food.  So we are getting weaker.  So some people think that you have not got mental health.  So the mind is very hard.  Some people don't even like the weather.  The solution to all of this is to change the way you live and the way you think.


 With the exception of some genetic disorders and congenital malformations, every human being is healthy from birth. He also has a great deal of healing power.

To live a beautiful and healthy life, plan a good diet and exercise. Combining diet and fasting, exercise and rest is a very good job.  A seven-year-old patient was reported to be in a very poor state of mind due to malnutrition.  Examination of the patient revealed that he was not getting adequate nutrition, the conditions at home were very mild, and so he kept the child at home to get adequate nutrition.  A month later, the boy's face lit up.  He is in good health now.



 A sick 18-year-old boy with a massive obesity in his arms, shortness of breath while walking, his intellect and memory were affected, he was given buttermilk and barley flour daily, some asanas, and walking exercises, the same weight loss by 10 pounds in 15 days.  .  He continued his routine like this and his wrestling has returned to normal and he is now a wrestler.

How to fight the disease:

 Nature is trying to get rid of the defects in our body. And if we help in that natural activity with a little bit of control, virtue, control over diet, rest, then the body will become healthy and our life will be long.

 In fact, having control over your diet means that diseases go away automatically. Also, in your daily diet, sweet, sour, salty, spicy, salty, bitter, astringent, these juices are more or less required in your body. Sweet, sour, salty, juicy.  Yoga reduces flatulence.  Astringent, sweet, bitter, juicy foods eliminate bile defects. And bitter, spicy, juice eliminates phlegm defects.


 If there is any defect in your body, then the predominance of any defect is in it. It is necessary to understand the predominance of any defect in your body with the help of experts.  Basti is a very good treatment for the manner in which your diet should be maintained, when the vata defect has increased in the body. Shining limbs, joint pain in the limbs, back pain, pain in any head, etc.

'Virechan' is a great treatment for the disorders caused by bile defects.  Use Triphala, Castor Oil, Sonamukhi, Nalitad in the laxative. Use bitter gum in the stomach.  Ghee is a very good liquid for bile.

 Now the man is always scared because of the cough defect.  There is a cough in the chest. The person is lethargic.  The best treatment for phlegm is to vomit and get rid of phlegm. For this, extract of jestha honey, honey, vekhand etc.  This causes dehydration and loss of phlegm.  Reddish, bitter, and astringent juices are used in the treatment of phlegm.  This juice should be taken in the stomach.  The first use of chili juice reduces the irritability, heaviness and lethargy caused by kapha, but the bitter juice should be treated with different foods.  A bitter juice diet reduces the sweetness of the mouth and eliminates phlegm.  Mucus is a fatty substance that builds up in the body.

Salt juice should be given first for flatulence. Rheumatism is cured quickly with salty juice food and liquid.  Salt juice is heavy so weight gain.

 There are many types of diseases that affect human beings. The causes and symptoms of many diseases are given in the scriptures. However, there are many diseases in the human body that are undiagnosed.  The reasons are not understood.  At that time, without panic, you should plan the substances that you think are appropriate. And you should try to eradicate the disease.

 Instead of using a single juice, one should use several substances together. This means that diseases disappear.  If there is an excess of guilt then it means disease and if it is in the same condition then it means health.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: